संबंधित बातम्या
बीड, सुरेश जाधव, प्रतिनिधी : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. पतसंस्थेच्या कॅशियरला भर वस्तीत लुटण्यात आलं आहे. पिस्तूल आणि चाकूचा धक दाखवून कॅशियरजवळील तब्बल 39 लाख रुपये लांबवण्यात आले आहेत. ही घटना आंबेजोगाई शहरात घडली आहे. या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पतसंस्थेच्या कॅशियरला तीन चोरट्यांनी रस्त्यात अडवून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आंबेजोगाई शहरात उघडकीस आला आहे.. जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम लुटल्याची घटना रात्री आठच्या दरम्यान घडली. यामुळें शहरात खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई शहरातील राजर्षी शाहू पतसंस्थेचे कॅशियर गणेश देशमुख हे रात्री 8.30 वाजता कामकाज आटोपून दिवसभरात जमा झालेली जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सेवकासोबत दुचाकीवरून निघाले होते. ते मुकुंदराज कॉलनीत आले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या तिघा चोरटयांनी त्यांना अडविले. स्वतः जवळील पिस्तूल काढून त्यांनी ती देशमुख यांच्या डोक्याला लावली. पिस्तूल आणि त्यासोबत चाकूचा धाक दाखवून देशमुख यांच्याकडील 39 लाख रुपयांची रक्कम हिसकावून चोरटे पळून गेले.भर वस्तीत घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.
- First Published :