सांगलीत सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन! विजेत्याला मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट – News18 मराठी

असिफ मुरसल, सांगली : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन सांगलीमध्ये करण्यात आलं आहे. सांगलीच्या कासेगावमध्ये हे आयोजन करण्यात आलं आहे. ही शर्यत अनोखी असणार आहे, कारण यातील विजेत्याला हटके बक्षीस मिळणार आहे. आतापर्यंत बैलगाडी विजेत्यांला थार गाडी आणि लाखोंची बक्षीसं देण्यात आली आहेत. अशा अनेक बक्षीसांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. मात्र कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून 17 फेब्रुवारी रोजी या बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडी स्पर्धेतील पहिल्या विजेत्यास 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येईल. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला 7 आणि 5 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

मध्यरात्री अचानक घराच्या दरवाजासमोर येऊन उभा राहिला ब्लॅक पँथर; मग…, थरकाप उडवणारा VIDEO

महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील हे सर्वात मोठं बक्षीस असणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातून 200 हून अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार आहेत. यासाठी 10 एकरावर मैदान तयार करण्यात आलं आहे. त्याचसोबत 1 लाख प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शरद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link