मनोज जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन, आंदोलन थांबणार नाही पण…

मुंबई : आजची पत्रकार परिषद ही विद्यार्थ्यांसाठी आहे मराठ्यांच्य माणसानं खबरदारी घ्यायची आहे. समाजानं लोकशाही मार्गानं आंदोलन करावं किंवा सध्या करू नये 20 आणि 21 तारखेनंतर ठासून आंदोलनं करू. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहे त्यांच्यात भीतीचं वातावरण व्हाययला नको. ते मोकळ्या मनानं हसत खेळत आले पाहिजे त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे.

20 तारखेनंतर आंदोलनाचं ठरवू तोपर्यंत थांबा, जरांगे पाटलांचं मराठा आंदोलकांना आवाहन केलं. मात्र अमंलबजावणी होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे.

मराठा समाज मुंबईला गेला अधिसूचना काढली हे आंदोलनाचं पहिलं यश होतं. अजूनही याची अंमलबजावणी केली नाही. त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी केली. शिंदे समितीला वर्षभराची मुदतवाढ द्या, सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी ती आम्ही दिलेल्या व्याख्याची अमंलबजावणी करा अशी मागणी केली आहे.

मागासवर्ग आयोगानं किती टक्के मराठ्यांना मागास ठरवलं हे त्यांनाच माहित, 16 टकक्यावरून 12 टक्के आणि आता 10 टक्क्यांवर आलंय. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.

येत्या 20 तारखेला विशेष अधिशेषण घेवू न त्यात मराठा आरक्षणावर चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.. मात्र हे आंदोलन सगे सोयरे शब्दासाठी आहे. जोपर्यंत सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी होतनाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय.

तेही येत्या 20 तारखेपर्यंतच द्यावं लागेल नसता आंदोलनाची दिशा बदलावी लागेल असा इशाराही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळं आता सरकार जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे कसं पाहतं हे महत्वाचं असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link