राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर : एमआयडीसीमधील एक कारखान्यात भीषण स्फोट झाले. या स्फोटाच्या आवाजाने नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. लोक पळताना दिसली. स्फोटानंतर कारखान्यात आग लागली होती. आगीमुळे परिसरात धुराचे लोट दिसले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पालघर-बोईसर तारापूर एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्याला भीषण आग लागली आहे. बारा वाजताच्या सुमारास या कारखान्यात भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर कारखान्यात आग लागली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. मात्र कोण कारखान्यात अडकलं आहे का नाही याची तपासणी सुरू आहे.
पालघर – बोईसर तारापूर एमआयडीसीतील एका कारखान्यात भीषण आग लागली, ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.#fire #Marathinews pic.twitter.com/4Y2KqRdzml
— News18Lokmat (@News18lokmat) February 17, 2024
आगीचे आणि धुराचे लोळ लांबच लांब पसरले असून नागरिकांनी मध्ये भीतीच वातावरण आहे. नागरिकांनी परिसरातून पळ काढला. एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, गाडीचा चुराडा; दोघांचा जागीच मृत्यू
अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचं वातावरण आहे. ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता चौकशी होणार का याकडे लक्ष आहे.
याआधी भिवंडीमध्ये भीषण आग लागली होती. गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 134, इंद्र नगर, बाजीप्रभू देशपांडे रोड येथे भीषण आग लागल्याची माहिती मिळत असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दल हजर आहे. गोवंडी परिसरातील आदर्श नगरमध्ये आग, झोपडपट्टीला भीषण आग, सुमारे 10 ते 15 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आली होती.
दिल्लीत मोठी दुर्घटना! जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मंडप कोसळला, अनेकजण अडकले
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी हजर होत्या, आत्तापर्यंत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. घर आणि दुकानात ठेवलेले सामान जळून खाक झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.