युट्यूबवर बघायचा अश्लील व्हिडीओ, अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

विजय देसाई, पालघर : नालासोपाऱ्यात ७ ते ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलींना टार्गेट करून बलात्कार करणाऱ्या सिरीयल रेपीस्टला अटक करण्यात आलीय. त्याला गुजरातमधून अटक केली आहे. मीरा भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट २ ने यश मिळवलं आहे. नालासोपाऱ्यात १३ फेब्रुवारी पीडीत मुलगी ७ वर्षे ही चष्मा विसरल्याने तो घेण्यासाठी घरी आली होती. तेव्हा आरोपी बिल्डींगमध्ये आला आणि त्याने पिडीत मुलीच्या हाताला पकडून जबरदस्तीने अनैसर्गित अत्याचार केले. ती विरोध करीत असताना जबरदस्तीने त्याने तिच्या हाताला पकडुन बिल्डींगच्या टेरसवरती नेवून अत्याचार केले आणि पळून गेला. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुजरात येथून बगावत शंकर मारवाडी २८ याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बगावत मारवाडी हा नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो परिसरातील झोपडपट्टीत राहत होता. तो फुगे, खेळणी विकण्याचे काम करीत असे. त्याचे आणि त्याच्या बायकोशी पटत नव्हते. त्यामुळे तो तिच्याकडे येवून जाऊन असायचा. त्याचे नातेवाईक डोंबिवली येथे राहत होते. युट्युबवर अश्लील व्हिडीओ पाहत असल्याने त्याच्या मध्ये विकृती निर्माण झाली होती. पत्नी व त्याचे संबंध बिघडल्याने वासना पूर्ण करण्यासाठी त्याने ५ ऑक्टोबर २३ रोजी एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. बिल्डींगच्या आडोशाला मुलीला घेवून गेला होता. मात्र त्या मुलीने आरडाओरडा केल्या नंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. मात्र १३ फेब्रुवारी २४ चा गुन्हा त्याला तुरुंगात घेवून गेला.

आरोपी घटनास्थळावरुन पळून जात असताना सी सी टी व्ही कॅमेरामध्ये चित्रीत झालेल्या फोटोच्या आधारे शोध घेतला. आरोपी हा नालासोपारा पश्चिम एस.टी. डेपो जवळील झोपडपटटीमध्ये व डोंबीवली येथे राहत असल्याची माहीती मिळाली. तात्काळ दोन्ही ठिकाणी पोलीस पथके पाठवून आरोपीचा त्या परीसरात शोध घेतला. तपासात आरोपीचे काही टेक्निकल बाबी प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्रवास करीत असलेल्या अजमेर एक्सप्रेस या ट्रेनमधून तपास पथक तात्काळ गुजरातच्या दिशेने रवाना केले.  आरोपी हा सुरत शहरात आल्याने सुरत सिटी क्राईम ब्रँच यांचे मदतीने त्याला सुरत येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी बगावत हा मुळचा राजस्थानचा असून अशाप्रकारे सुमारे ४ ते ५ महीन्यापूर्वी ओसवाल नगरी बाबा संकुल येथे एक ७ ते ८ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. बिल्डींगच्या आडोशाला नेवून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच तपासात निष्पन्न झाले आहे. पुन्हा एकदा गुन्हा करुन रेल्वेने पळून जाणाऱ्या आरोपीला सुरत येथून ताब्यात घेवून ४८ तासामध्ये गुन्हा उघडकीस आणला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link