अविनाश कानडजे/छत्रपती संभाजीनगर : किरकोळ वाद, मारहाण अशा कितीतरी घटना घडत असतात. अशाच एका घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांचा राडा झाला आहे. विद्यार्थ्यांनी बेल्टने मारहाण केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या फिल्मी स्टाईल मारहाणीची व्हिडीओ समोर आला आहे.
बिडकीन गावातील ही घटना. शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर मारहाण केली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला विद्यार्थ्यांचा घोळका उभा दिसतो आहे. सुरुवातीला घोळक्याच्या मध्ये काही विद्यार्थी भांडतान दिसत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झालेली दिसते. त्यानंतर काही वेळाने एक विद्यार्थी युनिफॉर्मचा बेल्टच काढतो आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला मारत सुटतो. त्याच विद्यार्थ्यावर आणखी एक-दोन मुलंही तुटून पडतात. त्याला बेदम मारहाण करतात.
Crime : 45 वर्षांचा शिक्षक सहावीतल्या मुलीसोबत फरार, खासगी शाळेतला धक्कादायक प्रकार
इतर विद्यार्थी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला असतात. पण कुणीच त्यांच्यात मध्यस्थी करून मारहाण सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत. या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी नेमकी कशावरून झाली, याचं कारण मात्र अद्याप माहिती नाही.
छत्रपती संभाजीनगरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी pic.twitter.com/Ybdkox8Vys
— News18Lokmat (@News18lokmat) February 17, 2024
नाशिकमध्ये तरुणींची महाविद्यालयात फ्री-स्टाईल हाणामारी
याआधी नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात असा प्रकार घडला होते. यात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. यातील दोघी एकमेकींचे केस ओढून हाणामारी करत आहेत. तर, इतर दोघी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थीनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/SGmGy0EqFU
— News18Lokmat (@News18lokmat) November 18, 2022
या विद्यार्थीनींची हाणामारी सुरू असताना आजूबाजूला बरेच विद्यार्थी जमा झाल्याचं पाहायला मिळतं. विद्यार्थी मोठमोठ्याने ओरडत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. तिथेच उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबईलमध्ये कैद केला.
ISIS च्या छत्रपती संभाजीनगर मॉड्युलचा पर्दाफाश! एनआयएच्या छाप्यात एकाला अटक
या तरुणींमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला, हे समजू शकलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.