जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या त्यांच्या बारामती या मतदारसंघात आहेत. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचा निर्णय दिला, यावर सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला. तसंच आर.आर.पाटलांच्या आठवणींनीही सुप्रिया सुळे भावुक झाल्या. 16 फेब्रुवारी 2015 साली आर.आर.पाटील यांचं निधन झालं होतं.
‘16 फेब्रुवारी हा माझ्यासाठी इमोशनल दिवस असतो. आज जयंत पाटील यांचा वाढदिवसही असतो. आर.आर.पाटील यांचे हार्ट बिट 80 वरून शून्यवर आलेलं मी डोळ्यांनी पाहिलं आहे. आबांचे बंधू कोलॅप्स झाले. जेव्हा जेव्हा लिलावती जवळून जाते तेव्हा आर.आर.पाटलांची आठवण येते. हक्काचा भाऊ आम्ही घालवला, सुमन वहिनी चांगलं काम करत आहेत. आबा रोहितच्या रुपाने आम्हाला दिसत आहेत,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंच्या सेल्फीवर अजितदादांचा निशाणा, संसदपटू पुरस्कारावरही टोले
‘आयुष्यात सगळ्या गोष्टी हिशोबाने करायच्या नसतात, वंदनाताई चव्हाण कर्तृत्ववान खासदार आहेत, सगळ्यात चांगला परफॉर्मन्स त्यांचा होता हे स्पीकर सांगतात, माझी लढाई कुणाशीही नाही. जो निकाल लागला तो घटनाबाह्य आहे, वडिलांना घरातून बाहेर काढाल का? जनसेवेसाठी आम्ही राजकारणात आलो आहोत,’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर टीका केली.
पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मी फॉलोअप घेत आहे, पाण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस चांगलं सहकार्य करत आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे, सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.